व्यापा-याचे घर फोडणारे तिघे अटकेत; लॅपटॉप, एलईडी जप्त  

औरंगाबाद : व्यापा-याचे घर फोडून चोराने रोख, लॅपटॉप व एलईडी लांबवला. हा प्रकार बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास एन-२, ठाकरेनगरातील महालक्ष्मी चौकात घडला होता. मुकेश महेंद्र साळवे, उमेश महेश गवळी, अक्षय डोके आणि आकाश आठवले उर्फ जाधव अशी घरफोड्यांची नावे आहेत. त्यापैकी पोलिसांनी मुकेश साळवे आणि उमेश गवळी यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी एलईडी आणि लॅपटॉप जप्त केला आहे.

व्यापारी प्रमोद नारायण खरात (47) हे लॉकडाऊन असल्याने कुटुंबियांसह भोकरदन तालुक्यातील कोठी या मुळगावी गेले होते. 26 मे रोजी सकाळी शेजारी राहणा-या कृष्णा सोनवणे यांनी संपर्क साधत खरात यांना घरफोडी झाल्याचे सांगितले. त्यावरुन खरात यांनी तात्काळ धाव घेत घराची पाहणी केल्यावर दरवाजाचे कुलूप तोडून चोरांनी कपाटातील सामान अस्ताव्यस्त केल्याचे दिसून आले होते. तसेच घरातील ३५ हजाराची रोकड, एलईडी आणि लॅपटॉप लांबवल्याचे समोर आले होते.

याप्रकरणाचा छडा लावत गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे व त्यांच्या पथकातील जमादार चंद्रकांत गवळी, शिपाई रितेश जाधव, विशाल पाटील, आनंद वाहुळ, अनिल थोरे, नितीन देशमुख यांनी दोघांना पकडले.