हृदयद्रावक ! धुळ्यात तीन लहान मुलांचा कालव्यात बुडून मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

धुळे : हॅलो महाराष्ट्र – धुळे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये तीन लहान मुलांचा कालव्यात बुडून मृत्यू (three children drowned in a canal) झाला आहे. मृत तिन्ही मुलं ही दहा ते बारा वयोगटातील आहेत. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे या मृत चिमुकल्यांच्या कुटुंबियांवर (three children drowned in a canal) दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील नवापाडा गावाजवळ ही घटना घडली आहे. ही मृत मुले गावाजवळील कालव्यात पोहण्यासाठी गेली होती. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने हि तिन्ही मुले कालव्यात वाहून (three children drowned in a canal) गेली. हुजैफ हुसेन पिंजारी, नोमान शेख मुख्तार, व अयान शहा शफी शाह अशी मृत मुलांची नावे आहेत. यावेळी एकूण सहा मित्र पोहण्यासाठी गेले होते. मात्र या तिघांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही (three children drowned in a canal) आणि पाण्याच्या प्रवाहात तिघेही वाहून गेले.

हे तिघेजण वाहून गेल्याचे (three children drowned in a canal) इतर मुलांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ कालव्याजवळ उपस्थित असलेल्या लोकांकडे मदत मागितली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यानंतर स्थानिकांच्या मदतीने या मुलांना कालव्याबाहेर काढले. त्यांना तातडीने पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्या अगोदरच या तिघांचा मृत्यू झाला होता.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई

धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या

Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर

हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर

Leave a Comment