Wednesday, June 7, 2023

सोलापुरात कोरोनामुळे तिघांचा मृत्यू, चौदा रुग्ण वाढले, एकूण बाधित 470

सोलापूर प्रतिनिधी | सोलापूर शहर परिसरातील तीन जणांचा आज कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. मागील चोवीस तासात 14 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने एकूण बाधितांची संख्या 470 त्र एकूण मृत व्यक्तींची संख्या 33 झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.  आज मयत झालेली पहिली व्यक्ती साई बाबा चौक परिसरातील 74 वर्षाचे पुरुष असून 18 मे रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांना छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी रात्री साडेदहा वाजता त्यांचे निधन झाले.

मयत झालेली दुसरी व्यक्ती अशोक चौक परिसरातील असून 77 वर्षाची पुरुष असून 13 मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय मध्ये सारीच्या उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले होते. 15 मे रोजी त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून 19 मे रोजी सायंकाळी सहा वाजता त्यांचे निधन झाले आहे. मयत झालेली तिसरी व्यक्ती शनिवार पेठ परिसरातील 64 वर्षाची महिला असून पाच मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले होते. 19 मे रोजी दुपारी दोन वाजता त्यांचे निधन झाले आहे.

आज नव्याने आढळलेल्या 14 कोरोनाबाधित व्यक्तींमध्ये पोलीस मुख्यालय शेजारील भगवान नगर मधील दोन महिला, साईबाबा चौकातील एक पुरुष व दोन महिला, बापुजी नगर येथील एक पुरुष, अशोक चौकातील एक महिला, रामवाडी येथील एक पुरुष, दक्षिण सदर बझार येथील एक महिला, सलगर वस्ती येथील एक पुरुष, कुमठा नाका येथील एक पुरुष, भारतरत्न इंदिरा नगर येथील दोन पुरुष, जुना विडी घरकुल येथील एक महिला यांचा समावेश आहे. आज दिवसभरात कोरोना चाचणीचे 219 अहवाल प्राप्त झाले असून 205 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 14 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोना मुक्त झालेल्या सात जणांना आज घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.