खळबळजनक ! एकाच कुटुंबातील तिघांची नदीत उडी मारुन आत्महत्या

धुळे : हॅलो महाराष्ट्र – धुळे जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील तिघांनी सामूहिक आत्महत्या केल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या कुटुंबाने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे प्राथमिक अंदाज आहे. या कुटुंबाने धुळ्यातील शिंदखेडा तालुक्यातील दमाशी येथील तापी नदीच्या पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे.

काय आहे प्रकरण
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील भोद गावात राहणारे राजेंद्र रायभान देसले यांनी आपली पत्नी आणि मुलीसह नदीवरुन उडी घेऊन आत्महत्या केली आहे.राजेंद्र रायभान देसले हे धरणगाव-एरंडोल तालुका शेतकरी संघाचे संचालक होते. राजेंद्र रायबन पाटील हे आपली पत्नी वंदना राजेंद्र पाटील आणि मुलगी ज्ञानल यांच्यासोबत अमळनेर येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. या कार्यक्रमानंतर हे कुटुंब आपल्या कारने भोद या ठिकाणी जाणयासाठी निघाल्यानंतर काही वेळाने त्यांचा मोबाइल क्रमांक बंद झाला.

नातेवाईकांनी त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोन बंद असल्याने तो होऊ शकला नाही. 17 मे रोजी त्यांची कार तापी नदीजवळ सापडली होती. यानंतर नदीपात्रात शोधाशोध केली असता राजेंद्र रायबन पाटील,पत्नी वंदना राजेंद्र पाटील आणि मुलगी ज्ञानल यांचे मृतदेह आढळुन आले. या तिघांनी आत्महत्या का केली? हे अजून समजू शकले नाही. या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

You might also like