व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

नातेवाईकाचे हातपाय बांधून आरोपीचे विवाहितेसोबत ‘हे’ दुष्कृत्य

सोनभद्र : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील सोनभद्र या ठिकाणी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आरोपींनी नातेवाईकाचे हातपाय बांधून एका विवाहितेवर सामूहिक अत्याचार केले आहेत. या आरोपींनी पीडित महिलेला जंगलात नेऊन तिच्यावर आळीपाळीने जबरदस्ती बलात्कार केला आहे. यावेळी आरोपींनी या महिलेच्या नातेवाईकांनासुद्धा मारहाण केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे तर एक जण फरार झाला आहे. पोलीस त्या फरार आरोपीचा कसून शोध घेत आहेत.

काय आहे नेमके प्रकरण ?
हि पीडित महिला घटनेच्या दिवशी आपल्या एका नातेवाईकासोबत सोनभद्रच्या घोरावल भागातील मुक्खा फॉलच्या जंगलातून दुचाकीने आपल्या घरी जात होत्या. यावेळी या आरोपींची नजर पीडित महिलेवर पडली. यानंतर या आरोपींनी पीडित महिलेचा आणि तिच्या नातेवाईकाचा पाठलाग सुरु केला. यानंतर पीडित महिला आणि तिचा नातेवाईक एका निर्जनस्थळी पोहोचल्यानंतर आरोपींनी दोघांना अडवलं आणि पीडितेसोबत जबरदस्ती करायला सुरुवात केली.

यावेळी महिलेच्या नातेवाईकाने विरोध केला असता, आरोपींनी त्या नातेवाईकाला बेदम मारहाण केली.हे आरोपी नराधम एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी त्या नातेवाईकाचे हातपाय बांधले. यानंतर त्यांनी पीडित विवाहितेला घनदाट जंगलात घेऊन जात तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी तातडीने कारवाई करत अवघ्या काही तासांतच पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. तर एक आरोपी फरार झाला आहे. पोलीस या फरार आरोपीचा कसून शोध घेत आहेत.