चंद्रपूरात वाघाच्या हल्ल्यात युवक जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

डोक्याला आणि डोळ्याला ओरबाडल्याने युवक गंभीर..

चंद्रपूर प्रतिनिधी

वाघाच्या हल्ल्यात एक तरुण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात युवक जखमी झाल्याने त्याला मूल येथिल उपजिल्हा रूग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. येथील उपचारानंतर युवकाला चंद्रपूर येथील जिल्हा रूग्णालयात उपचाराकरीता पाठविण्यात आले आहे. जखमी झालेल्या युवकाचे नाव प्रकाश ठाकरे असून मूल तालुक्यातील भंजाळी येथील तो रहिवासी आहे.

मिळालेल्या माहिती नुसार ही घटना मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास मूल तालुक्यातील भंजाळी या गावातील शेत सर्वे नं ३८ च्या पोंभूर्णा वनपरीक्षेत्रात घडली आहे. या घटनेमुळे गावकऱ्यांत भितीचे वातावरण मोठ्या प्रमाणात पसरले आहे. प्रकाश ठाकरे हे नेहमी प्रमाणे स्वतःच्या शेतात आपल्या गुरांना चरायला गेला होता. दररोज ची दिनचर्या असलेल्या ठाकरें दबा धरून असलेला वाघ दिसला नाही.

वाघाने प्रकाश यांच्यावर झडप टाकून त्यांच्या डोळयावरील व डोक्याच्या मागिल भागाला जखमी केले आहे. प्रकाश यामध्ये गँभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांना त्वरित इस्पितळात दाखल केले आहे. गावकऱ्यांनी सदर घटनेची माहिती वनविभाला दिली असता वनविभागाने घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला. यावेळी (घोसरी) पोंभुर्णाचे क्षेत्र साहायक ए.बी.पालीकोंडावार, वनरक्षक जी.एल.आळे उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment