चंद्रपुरात पुन्हा वाघाची दहशत ; एक शेतकरी मृत्यूमुखी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चंद्रपूर | ‘अवनी’ वाघीनीच्या हत्येनंतर केंद्रीय मंत्री मनेका गांधी आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली होती. वाघाची दहशत आणि नागरिकांची सुरक्षितता यावर मधल्या काळात बरिच चर्चा झाली. अशात चंद्रपूर मधे पून्हा एकदा वाघाची दहशत पहायला मिळाली आहे. वाघाने केलेल्या हल्ल्यात एका शेतर्याचा मृत्यू झाला आहे. देवराव भिकाजी जीवतोडे (वय ६८) असे मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे.

काही दिवस शांत झालेलं वाघाचं प्रकरणाने पुन्हा एकदा महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. देवराव हे सोमवारी रात्री आपल्या शेतावर गेल्यांनंतर सकाळी घरी परत येत असताना वाघाने त्यांच्यावर झडप टाकली. वाघाने केलेल्या या हल्ल्यात जीवतोडे हे गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

‌चंद्रपूर, यवतमाळ या भागात वाघांची दहशत प्रचंड माजली आहे. अवनी प्रकरणानंतर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्राणीहल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांना १५ लाखांची मदत जाहीर केली असली तरी नागरिकांमध्ये सरकारविरोधात संतापाची लाट उसळत आहे.

Leave a Comment