अमरावती मेळघाट प्रतिनिधी | आशिष गवई
वन्यजीव विभाग मेळघाट अंतर्गत येणाऱ्या जितापूर शेतशिवारांमध्ये दोन दिवसांआधी ८ ते १० वर्षे वयोगटातील मादी वाघिणीचा कुजलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळला होता . वाघ मृतावस्थेत आढळलेल्या माहितीने शिकार झाली की काय ? असा अंदाज आधी येत होता . मात्र मृत वाघिणीचा मृत्यू हा ५ ते ६ दिवसांपूर्वी नैसर्गिक झाला असल्याचे संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी व्यक्त केले आहे.
अकोट रेंज वन्यजीव विभाग मेळघाट अंतर्गत येणाऱ्या जितापूर शेतशिवार येथील १०७७ वनखंड अंतर्गत कुजलेल्या अवस्थेमध्ये वाघिणीचा मृतदेह आढळला होता . मृतदेहाची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल माळी तसेच जे एस सौदागर यांनी घटना स्थळावर पोहोचुन पंचनामा करत त्यांना आठ ते दहा वर्षे वयोगटातील असणारी वाघिणीचे नखे, दात ,मांस ,हाडे ,इतर संवेदनशील सर्व अंग सुस्थितीमध्ये असल्याचे आढळून आले. तर या वाघिणीने एक सर्वसाधारण रानडुकर ही खाल्ला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले . घटनास्थळी वाघिणीचा पंचनाम्यासाठी डॉक्टर सुद्धा उपस्थित होते. त्याचबरोबर वाघीण ज्या परिसरामध्ये मृतावस्थेत आढळली त्या परिसरातील एक ते दिड किलोमीटर पर्यंत सर्व परिसर शोधून काढला .
आसपासच्या परिसरातील तळयातील पाण्याचेही नमुने अधिकाऱ्यांनी सोबत घेतले आहेत. शेतशिवार परिसरात असल्यामुळे वाघिणीला करंट लागला आहे का याचा सुद्धा तपास करण्यात आला .मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये या वाघाला मारण्यात आले नसून शिकार सुद्धा झाली नसल्याचे अधिकाऱ्यांचे सांगणे आहे. तर या वाघिणीचा मृत्यू डुकरांच्या झालेल्या झटापटीमुळे किंवा इतर हिंस पशू सोबत झालेल्या झटापटीमूळे झालेला असावा असा कयास लावण्यात आला आहे.
वाघिणीचे वय आठ दहा वर्षे असल्यामुळे ती वाघीण जवळपास वृद्ध झाली होती व झालेल्या हल्ल्याच्या प्रेशरमुळे व जखमांच्या तिव्र वेदनांमूळे तिचा मृत्यू झाला असावा असाही अंदाज वनसंरक्षक विशाल माळी यांनी व्यक्त केला .