टिकटॉकवरील बंदीमुळे ‘हा’ धुळेकर झाला उध्वस्त; म्हणाला,”माझ्या दोन्ही बायका ढसा ढसा रडल्या”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असणाऱ्या टिकटॉकने अनेक जणांना प्रसिद्धी मिळवून दिल. अनेक चाहते मिळवून दिले आणि त्याचबरोबर पैसाही मिळवून दिला. सिनेसृष्टीतील कलाकारांप्रमाणेच टिकटॉकवरील सेलिब्रेटीचंही समाज माध्यमात एक वलय तयार झालं होतं. मात्र, २९ जुलै रोजी केंद्र सरकारने एक निर्णय घेतला ज्यामुळे सगळेच टिकटॉक स्टार्स चिंतीत पडले. याच टिकटॉकवरून लाखो लोकांपर्यंत पोहोचलेले धुळ्याचे दिनेश पवार हेही त्यापैकीच एक आहे. दोन बायकांसह राहत असलेल्या दिनेश पवार यांच्या कुटुंबाला मात्र टिकटॉक बंद करण्याच्या निर्णयाचा चांगलाच धक्का बसला. इतकंच काय, तर “आम्ही उद्ध्वस्त झालो, आणि ही बातमी ऐकून माझ्या दोन्ही बायका ढसाढसा रडल्या,”अशी प्रतिक्रियाही टिकटॉक स्टार असलेल्या दिनेश पवार यांनी व्यक्त केली.

गलवान व्हॅलीतील संघर्षावरून भारत-चीन यांच्यातील संबंध ताणले गेलेले असतानाच केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी काही चिनी अ‍ॅप हे देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचा इशारा दिला होता. त्यानंतर २९ जुलै रोजी केंद्र सरकारनं ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. हा निर्णय म्हणजे टिकटॉकवरून प्रसिद्धीस आलेल्या लोकांसाठी एक मोठा झटकाच होता. या निर्णयानंतर धुळे जिल्ह्यातील प्रसिद्ध टिकटॉकर दिनेश पवार यांच्याविषयीचं वृत्त द प्रिंटनं दिलं.

टिकटॉकवरील बंदीच्या मोदी सरकारच्या निर्णयानंतर प्रतिक्रिया देताना दिनेश पवार म्हणाले की,”आम्ही पुरते उद्ध्वस्त झालो आहोत, पण आम्हाला याचीही जाणीव झाली की, यामुळे फक्त आम्हीच नाही तर अनेक लोकही हादरले आहेत. टिकटॉकवर बंदी आणल्याची बातमी बघून माझ्या दोन्हीही बायका इतरांप्रमाणेच ढसाढसा रडल्या. टिकटॉकवरील बंदीच्या या निर्णयामुळे आमच्यासारखे लाखो लोक दुखावले गेले आहेत. मात्र, आता आम्ही यू ट्यूबकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे,” असं दिनेश पवार यांनी सांगितलं.

दिनेश पवार यांनी नव्वदच्या दशकातील बॉलिवूड सिनेमातील गाण्यावर डान्स करून टिकटॉक व्हिडीओ बनवले. यातून त्यांनी ३० लाख रूपयांची कमाई देखील केली आहे. मात्र, दिनेश पवार यांनी आपल्याला ३० लाख रुपये मिळाल्याच्या बातमीला फेटाळलं आहे. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममधून आम्हाला काहीही पैसे मिळायचे नाही. मात्र त्यामुळे आम्हाला आमची प्रसिध्दीची हौस पुर्ण करण्यासाठी मदत झाली, असं त्यांनि म्हंटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment