TikTok ने ट्रम्प यांच्या ‘त्या’ आदेशाविरोधात ठोठावलं न्यायालयाचं दार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वॉशिग्टन । अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना कडवी झुंज देणारे जो बायडन (Joe Biden) विजयी झाले. अमेरिकेत सत्ता परिवर्तन होताच TikTok ने ट्रम्प यांच्या एका आदेशाविरोधात न्यायालयाचं दार ठोठावलं आहे. शॉर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्म TikTok वर बंदी आणण्यासाठी अमेरीकन सरकार सातत्याने प्रयत्न करत होतं.

अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 12 नोव्हेंबरपासून अमेरिकेत TikTok बॅन केलं जाईल असे आदेश दिले होते. परंतु अमेरिकेत सत्ता परिवर्तन होताच TikTok ने ट्रम्प यांच्याविरोधात कोर्टात याचिका दाखल केली आहे. अमेरीकन सरकारच्या बंदीविरोधात TikTok ने कोर्टात ट्रम्प प्रशासनाविरोधात याचिका दाखल केली आहे. तत्पूर्वी फेडरल कोर्टाच्या न्यायाधीशांनी ट्रम्प यांच्या TikTok वर बंदी घालण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. त्यानंतर आता TikTok नेही ट्रम्प यांच्या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागितली आहे.

ट्रम्प यांनी दिले होते TikTok वर बंदीचे आदेश
डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय सुरक्षेचं कारण पुढे करत शॉर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्म TikTok वर अमेरिकेत बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. त्यासंबंधी ट्रम्प प्रशासनाने आदेशही दिले होते. तसेच यावेळी ट्रम्प प्रशासनाने म्हटले होते की, TikTok हे अॅप युजर्सची खासगी माहिती साठवून ठेवत आहे. याचा देशाच्या सुरक्षेला मोठा धोका आहे.

कोर्टाची ट्रम्प यांच्या निर्णयाला स्थगिती
पेन्सिलव्हेनियाच्या कोर्टाने ट्रम्प यांच्या TikTok वरील बंदीच्या आदेशाला स्थगिती दिली होती. तीन क्रिएटर्सनी यासंबंधी याचिका दाखल केली होती. त्यावर फैसला सुनावताना न्यायाधीश वेंडी व्हिटलस्टोन म्हणाले होते की, TikTok वर बनवले जाणारे व्हिडीओ हे युजर्सचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे.

ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

 

 

Leave a Comment