देहरादून | तिरथ सिंह रावत यांनी उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. देहरादूनमध्ये भाजपा विधायक दलाची बैठक पार पडली. त्या बैठकीमध्ये सिंह रावत यांना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घेतला गेला. तीरथ सिंह रावत हे उत्तराखंडच्या पौडी गडवाल लोकसभा मतदार संघाचे खासदार आहेत. विद्यार्थी राजकारणापासून ते राजकीय जीवनात सक्रिय आहेत.
56 वर्षीय सिंह रावत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सोबत जोडले गेले आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदसाठी कामही त्यांनी केले आहे. वर्ष 1997 ते 2002 मध्ये तीरथ सिंह रावत हे यूपीच्या विधानपरिषद सदस्य राहिले आहेत. सोबतच 2000 ते 2002 या काळात ते उत्तराखंडचे शिक्षण मंत्री देखील राहिले होते. सन 2012 ते 17 यामध्ये उत्तराखंडमध्ये आमदार म्हणूननही निवडून आले. मे 2019 मध्ये ते लोकसभेला निवडून आले होते.
काल नवी दिल्लीमध्ये झालेल्या भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वासोबतच्या बैठकीनंतर त्रिवेंद्र सिंह रावत यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपाल बेबी राणी मोर्य यांच्याकडे सुपूर्द केला होता. राज्यपाल यांनी मुख्यमंत्री रावत यांचा राजीनामा स्वीकार केल्यानंतर नवीन मुख्यमंत्र्यांच्या निवडीपर्यंत त्यांनाच कार्यकारी मुख्यमंत्री म्हणून पदभार सांभाळण्याचे सुचित केले होते. त्यानुसार त्यांनी राज्याचा कार्यकारी मुख्यमंत्री म्हणून नवीन मुख्यमंत्र्यांच्या निवडी पर्यंत कार्यभार सांभाळला. तीरथ सिंह रावत यांची नवीन मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर अनेक नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’