सलग दुसऱ्या दिवशी घसरले सोन्याचे दर, नवीन दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकन डॉलरच्या झालेल्या घसरणीमुळे देशांतर्गत बाजारात सोन्याची खरेदी आता स्वस्त झाली आहे. गुरुवारनंतर दिल्लीच्या सोन्याच्या स्पॉट रेटमध्ये शुक्रवारी सोन्याच्या किंमती खाली आल्या आहेत. या काळात दर दहा ग्रॅमच्या किमतींमध्ये 271 रुपयांची मोठी घसरण झाली आहे. त्याचबरोबर, एक किलो चांदीच्या किंमतीतही 512 रुपयांनी घट झाली आहे. शेअर बाजारात परत सुरु झालेली खरेदी आणि अमेरिकन डॉलरची झालेली घसरण यामुळे सोन्याच्या किंमती खाली आल्या असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सोन्याच्या नवीन किंमती
एचडीएफसी सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, बुधवारी दिल्ली सराफा बाजारात 99.9 टक्के शुद्धतेसह 10 ग्रॅम सोन्याची किंमत ही प्रति दहा ग्रॅम 49,729 रुपये वरुन 50,000 रुपये झाली आहे. या काळात प्रति दहा ग्रॅम सोन्याच्या किंमती या 271 रुपयांनी घसरलेल्या आहेत.

चांदीच्या नवीन किंमती
चांदीच्या किंमतींमध्येही सतत वाढ दिसून येत आहे. चांदीच्या दरात 512 रुपयांची घसरण झाली, त्यानंतर आता नवीन किंमत 53,382 रुपयांवर पोहोचली आहे. याआधी चांदीचा भाव हा 53,894 रुपयांवर बंद झाला होता.

सोन्या-चांदीच्या किंमती का घसरल्या
एचडीएफसी सिक्युरिटीचे कमोडिटी अ‍ॅनालिस्ट तपन पटेल यांचे म्हणणे आहे की, कोरोना लसीबद्दलच्या सकारात्मक बातमीमुळे शेअर बाजारात पुन्हा खरेदी झाली आहे. ज्यामुळे गुंतवणूकदारांनी आता सोन्यातील गुंतवणूक कमी केली आहे. तसेच अमेरिकी डॉलर देखील कमकुवत झाल्यामुळे भारतीय रुपया मजबूत झाला आहे. या सर्व लक्षणांमुळे आता सोन्याच्या किंमती खाली आल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.