Tuesday, June 6, 2023

सोन्याच्या किंमतींमध्ये विक्रमी वाढ; सोने पोहोचले 54 हजार रुपयांपर्यंत, जाणून घ्या आजचे नवीन दर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मंगळवारच्या घसरणीनंतर बुधवारी पुन्हा सोन्याच्या किंमतींमध्ये पुन्हा एकदा विक्रमी वाढ झाली आहे. दिल्लीत 10 ग्रॅम सोन्याच्या किंमतीत 710 रुपयांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर, एक किलो चांदीची किंमत ही 313 रुपयांनी महाग झाली आहे. तज्ज्ञांचे याबाबत म्हणणे आहे की, सोन्याने मागील विक्रम तोडला आहे आणि एक नवीन विक्रम स्थापित केला आहे. तो सर्व-उच्च स्तरावर व्यापार करीत आहे. परदेशी स्पॉट मार्केटमध्ये गोल्डची स्पॉट प्राइस ही 1,981 डॉलरच्या नवीन उच्चांकावर पोहोचला. येत्या काही दिवसांत सोन्याची किंमत 2,026 डॉलरवर जाण्याची शक्यता आहे, जो त्याचा अल्पकालीन प्रतिकार असेल. एकूणच सोन्यामध्ये आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे. जर अमेरिका प्रोत्साहन पॅकेजची घोषणा करत नसेल तर केवळ सोन्याच्या किंमतींमध्ये थोड्या प्रमाणात घसरण दिसून येईल.

सोन्याची आजची किंमत
बुधवारी दिल्लीच्या सराफा बाजारात 99.9 टक्के शुद्धतेसह सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 53,087 रुपयांवरून वाढून 53,797 रुपये प्रति दहा ग्रॅम झाली आहे. या काळात प्रति दहा ग्रॅम दरात 710 रुपयांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर मुंबईतील शुद्धतेसह सोन्याची किंमत 52760.00 रुपयांच्या पातळीवर आहे.

चांदीची आजची किंमत
बुधवारी चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. दिल्लीत एक किलो चांदीची किंमत 65,227 रुपयांवरून 65,540 रुपयांवर गेली आहे. या काळात किंमतींमध्ये 313 रुपयांची वाढ झाली आहे. त्याचबरोबर मुंबईतील चांदीचा दर प्रति किलो 63951.00 रुपये आहे.

सोन्याच्या किंमतींमध्ये काय वाढ होईल
अ‍ॅक्सिस सिक्युरिटीजच्या वृत्तानुसार 2011 नंतर सोन्याने आपला सर्वकालीन उच्चांक गाठला आहे. सोन्याने 1980 डॉलरची पातळी ओलांडली आहे. हा एक महत्त्वाचा स्तर आहे. या प्रकरणात, रुपयांच्या बाबतीत सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 57,000 ते 58,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठीआम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.