Wednesday, March 29, 2023

सोन्या-चांदीच्या किंमतीत 2000 रुपयांपेक्षा जास्त वाढ, नवीन दर जाणून घ्या

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकन डॉलर निर्देशांकातील कमकुवतपणामुळे आणि दहा वर्षांच्या अमेरिकन बाँडच्या उत्पन्नात घट झाल्यामुळे परकीय बाजारात सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. आज याचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही झाला आहे. दिल्ली सराफा बाजारात पेरती 10 ग्रॅम सोन्याची किंमत वाढून 418 रुपये झाली. त्याचबरोबर चांदीचे दर प्रति किलो 2,246 रुपयांनी वाढले आहेत. तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की विकसित अर्थव्यवस्थांच्या कमकुवत आर्थिक आकडेवारीमुळे आज सोन्या-चांदीच्या किंमती मजबूत झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कमकुवत डॉलरच्या पाठिंब्याने सोन्याचे दर दोन आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. वृत्तसंस्थेच्या रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, परदेशी बाजारात सोन्याची किंमत 1,968.98 (सोन्याचे स्पॉट प्राइस) झाली आहे.

सोन्याचे नवीन दर
एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते मंगळवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत प्रति दहा ग्रॅम 418 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 52,545 रुपयांवरून 52,963 रुपयांवर गेली आहे.

- Advertisement -

चांदीचे नवीन दर
सोन्याप्रमाणेच चांदीच्या किंमतीतही वाढ दिसून आली आहे. आज दिल्ली सराफा बाजारात चांदीचा दर 2,246 रुपयांनी वाढला असून त्यानंतर तो 72,793 रुपयांवर पोहोचला आहे. गुरुवारी दिवसभराच्या व्यापारानंतर चांदीचा दर प्रति किलो 70,547 रुपयांवर बंद झाला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.