तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना नुकसानभरपाई देणार : मुख्यमंत्री

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: मागील आठवड्यात महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यावर आणि तेथील जिल्ह्यांना तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसून मोठे नुकसान झाले या नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला त्यानंतर आता नुकसानग्रस्तांना नुकसानी प्रमाणे मदत दिली जाईल अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

याबाबत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते , कोरोना संकट असताना त्यात तौक्ते चक्रीवादळाने भर टाकली आहे. शेवटी वाऱ्याचा वेग आणि पावसाचा जोर यावर नुकसान अवलंबून असतं. दुर्दैवानं काही मृत्यू झाले आहेत. कोणत्या निकषानुसार मदत करायची हे आढावा घेतल्यानंतर ठरवले जाईल. असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं.

मदतीचे आदेश तात्काळ देण्यात आले आहेत. पंचनामे येत्या दोन दिवसात पूर्ण होतील. त्यांचा अहवाल आल्यानंतर आम्ही मदती संबंधी निर्णय घेऊ कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही असे आश्‍वासन ठाकरे यांनी दिलं होतं. पॅकेजवर माझा विश्वास नाही जे गरजेचे आहे ते करणार असेही ते म्हणाले होते. मदतीचे निकष बदलण्यासाठी आपण मोदींसोबत झालेल्या बैठकीत सांगितलं होतं. पुन्हा एकदा त्यांच्याशी बोलणार असल्याची माहिती तेव्हा त्यांच्याकडून देण्यात आली होती.

Leave a Comment