पर्यटन स्थळे अनलॉक करण्याची टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : राज्य सरकारतर्फे सर्व काही अनलॉक केले आहे.  त्यामुळे पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटन स्थळेही अनलॉक करीत ती पर्यटकांसाठी खुली करावेत, अशी मागणी औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशन तर्फे केंद्रीय पर्यटनमंत्री सिंग व राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे राज्याचे सचिव वल्सा नायर आणि पुरातत्त्व विभागाचे महासंचालक विद्यावती जिल्हाधिकारी यांच्याकडे फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील कोठारी यांनी सोमवारी निवेदनाद्वारे करण्यात आली.

निवेदनात म्हटले की, कोरोनाच्या काळात औरंगाबाद येथील पर्यटन उद्योग कोसळला आहे. गेल्या वर्षापासून कोरोनामुळे जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे, स्मारके बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे यावर अवलंबून असलेले हॉटेल्स, रेस्टॉरंट, मार्गदर्शक, ड्रायव्हर्स, क्लिनर, पुस्तक विक्रेते, परफॉर्मिंग आर्टिस्ट, संगीतकार, कारागीर व शिल्पकार हस्तकला व हस्तकलेचे उत्पादन तंत्रज्ञानमध्ये काम करणारे कर्मचारी यांचे नुकसान झाले आहे. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे करण्याचे नियम पाळत सर्वच पर्यटनस्थळे सुरू करावीत.

कोरोनाचे नियम पाळत आम्ही सेवा देण्यास तयार आहोत. विमानसेवा, हॉटेल्स, रेस्टॉरंट, मॉल, दुकाने, कार्यालये, उद्योग, सिनेमागृह सुरू करण्यास परवानगी मिळाली. आता पर्यटन स्थळे सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणीही करण्यात आली. निवेदनावर फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील कोठारी, सरचिटणीस उमेश जाधव, जसवंतसिंग राजपूत यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Comment