रानमेवा देणारा आरोग्यवर्धक ‘सह्याद्री’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी |  सकलेन मुलाणी , 

सह्याद्रीचा निसर्गसंपन्न तालुका म्हणून पाटण तालुक्याची ओळख आहे. चोहोबाजूनी उंच डोंगरदऱ्यानी वेढलेल्यात नयनरम्य निसर्गाची उधळण तर आहेच. परंतु या निसर्गामध्ये दडलेय ती निसर्गसंपत्ती जी मानवास आरोग्यदायी आहे. फक्त इतरांस आरोग्य न देता या निसर्गाची देखभाल करणाऱ्यांची पोटापाण्याची सोय सुध्दा करते.

घनदाट जंगलात जिथे नजर ही पोहचत नाही तिथे राहतो तो या निसर्गाचा रखवालदार. निसर्गाने दिलेले वरदान वडीलोपार्जित व्यवसाय हा यांचा मूळ आर्थिक स्तोत्र. पहाट उजाडली की लगबग सुरु होती ती आसपासच्या जंगलात जाण्याची. तसे पाहता हा जरी त्यांचा नित्य उपक्रम असला तरी यावेळी मात्र कारण असते ते वेगळे…एप्रिल ते मे महीना व अर्धा जून निसर्गात विविध रानमेवा आढळून येतो.यात करवंद,जांभूळ, अळू, तोरणे,काजू,आंबे व इतर फळे…ही फळे तोडून लवकर शहरात जाऊन व विकून परत आपल्या घरी लवकर परतण्याची घाईत प्रत्येक जण असतो. यामध्ये प्रामुख्याने घरातील महीला व लहान मुले ज्यांना या दिवशी शाळेस सुट्टी असते.

तसे पाहता हे मिळणारे दोन पैसे काही सोपे नसतात. ही फळे असणारी झाडे जवळपास काटेरी असतात. सकाळी सुरु होणाऱ्या शर्यतीत पहीले कोण ? यातून ही स्पर्धा सुरु होती. त्यात हाताला काटे लागतात पण उदिष्टासमोर याची वेदना जाणवत नसते. अनेक गावांतून असे विक्रते येत असतात परंतु ग्राहक मात्र महामार्गावरुन प्रवास करणारे प्रवासी. मोठी बसस्थानके, बाजार मंडई व गर्दीचा परीसर असतो. विक्रते स्पर्धक खूप असल्यामुळे कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गावर हे लोक जागोजागी रस्ताच्या कडेला बसून ही फळे विकतात. एखादी गाडी आली की लहान मुले हातात ही फळे घेऊन धाव घेतात. जर गाडीतील प्रवाशी यांनी घेण्यास पसंती दाखविली तर खुश नाहीतर पुढील गाडी.कारण फळे तर विकलीच पाहीजेत यातूनच दोन पैसे मिळणार ही भावना प्रखर दिसून येते.

तसे पाहता यांतील काही फळे तोडल्यावर सायंकाळ पर्यंत जास्त काळ ताजी राहत नाहीत. व शिळी फळे विकण्याची गरज पण नाही. कारण ही फळे मुबलक प्रमाणात जंगलात असतात त्यामुळे ताजीच फळे ग्राहकांना मिळतात. १०० टक्के नैसर्गिक आरोग्यदायी असणारी फळे नेहमीचे जाणकार ग्राहक घेताना फक्त दरात कमी जास्त करतात. मात्र नवीन ग्राहक जरा फळांविषयी माहीती घेताना दिसतात ज्यावेळी यातील आरोग्यदायी गुण समजतात त्याचवेळी ते खरेदी करतात.

 हा रानमेवा आता बऱ्याच औषध कंपनी मोठ्या प्रमाणात खरेदी करतात त्यामध्ये आयुर्वेदीक कंपन्यांचा समावेश आहे. तर काही कंपन्या प्रकीया करुन याचा रस बनवून सरबत करून विकतात बाजारात यांची मागणी वाढत आहे. एकमात्र खरे आहे की निसर्ग हा नेहमीच मानवांस काहीतरी देतच असतो.

Leave a Comment