ट्रॅक्टर पलटून १ जागीच ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी |सकलेन मुलाणी 

दगडाची डबर ओढत असताना  ट्रॅक्टर पलटी होऊन एक जण जागीच ठार झाल्याची घटना कराड तालुक्यातील येणपे येथे घडली आहे. बाळासो राजाराम शेवाळे वय ( ४३) असे मृताचे नाव आहे.

येणपे ता. कराड नजीक माटेकरवाडी येथे  बाळासो शेवाळे हे दगडाची डबर  ओढण्यासाठी गेले असता अचानक ट्रॅक्टर वरील ताबा सुटल्याने  शेताच्या बांधावरून ट्रॅक्टरने  दोन पलटी घेतल्या . ट्रॅक्टरने पलटी घेतल्याने चालक बाळासो शेवाळे हे ट्रॅक्टर चे स्टेरिंग व ट्रॅक्टरचा छत यांच्यामध्ये अडकल्याने जागीच ठार झाले आहेत.

घटना समजताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली .या घटनेची परिसरातून हळहळ व्यक्त केले जात असून घटनेची नोंद कराड ग्रामीण पोलिस स्टेशन मध्ये नोंद झाली आहे.

Leave a Comment