आता व्यापऱ्यांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक अन्यथा कारवाई होणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : जिल्ह्यात 7 जुनापासून शहर पूर्णतः अनलॉक तर ग्रामीण भागात सायंकाळी 4 वाजेपर्यंत सर्व दुकाने, हॉटेल्स, बार रेस्टोरंट सुरु करण्यात आले आहे. त्यासोबतच जिल्हा प्रशासनाने व्यपारांना सात दिवसात कोरोना चाचण्या करून घेण्यास मुदतही दिली होती. ही डेडलाईन आता संपली असून व्यापारांविरोधात कारवाईची कडक मोहीम सुरु केली जाणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मंगळवारी दिला आहे.

कोरोना महामारीचा उद्रेक झाल्याने शासनाने 14 एप्रिलपासून जीवनावश्यक आणि अत्यावशक सेवा वगळता सर्व व्यापार व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मागील दीड महिन्यांपासून ही सर्व यंत्रणा बंद होती. रुग्णसंख्या नियंत्रणात येण्यास सुरुवात झाल्याने व बहुतांश जिल्ह्याचा पॉझिटिव्ह दर 10 टक्क्यांच्या आत असल्याने पाच स्तर निश्चित करून निर्बंधामध्ये शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यात जिल्ह्याची शहर आणि ग्रामीण अशी विभागणी करून त्यानुसार पॉझिटिव्ह दराचा विचार करण्यात आला आहे. त्यामुळे शहराचा पहिल्या तर ग्रामीणचा तिसऱ्या स्तरात समावेश करून निर्बंधात शितीलता दिली आहे. दरम्यान शासनाच्या नव्या नियमावलिनुसार शहर 7 जुनपासून पूर्णतः अनलॉक झाले आहे. ग्रामीणमध्ये दुपारी 4 वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे. त्यासोबतच सर्व प्रकारच्या दुकानंदारांना व हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार मालकांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना कोरोना चाचण्या करून घेण्याची मुदत देण्यात आली होती. ही मुदत 14 जूनला संपली आहे. त्यामुळे आता ज्या व्यपारांनी कोरोना चाचण्या करून घेतलेल्या नाहीत त्यांच्याविरोधात कारवाई केली जाणार आहे. अशी माहिती जिल्ह्याधिकारी चव्हाण यांनी दिली आहे. शहारात मनपा प्रशासनाला तर ग्रामीण मध्ये तहसील आणि जिल्हा परिषद, नगरपालिका प्रशासनाला तर ग्रामीणमध्ये तहसील आणि जिल्हा परिषद, नगरपालिका प्रशासनाला याबाबत सूचना देण्यात आल्याचेही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले.

Leave a Comment