व्यापारी- पोलिसांच्यात वादावादी ः वीकेंड लाॅकडाऊनंतर बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दीच गर्दी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

दोन दिवसांच्या विकेंड लाॅकडाऊन कडक पाळणार्‍या नागरिकांनी आज मात्र बाजारपेठेत गर्दीच- गर्दी  केली होती. येत्या दोन दिवसांत लाॅकडाऊन लागणारच या शक्यतेमुळे ग्रामीण भागासह शहरातील लोकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडलेला दिसून आला. तर पोलिस प्रशासन सोडले तर प्रशासनांची कारवाई पथके व इतर विभाग कुठे गायब झाली असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कराडच्या बाजारपेठेत विशेष करुन मूख्य बाजारपेठेत लोकांनी मोठी गर्दी केल्याने अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली होती. राज्य व्यापार असोशिएशने राज्यातील व्यापारी सकाळी दहा ते पाच आपली दूकाने सूरू ठेवतील अशी घोषणा केली होती.  शहरातील व्यापार्‍यांनी सकाळी दूकाने उघडली होती. मात्र पोलिस प्रशासनाने तात्काळ बाजारपेठेत धाव घेत दूकाने बंद करण्याचा प्रयत्न केला, यावेळी अनेक ठिकाणी व्यापारी पोलिस यांच्यात वादावादीचे प्रकार ही घडले. राज्य शासनाने दूकाने उघडण्याबाबत कोणतेही आदेश दिलेले नसताना दूकाने उघडण्यात आल्याने प्रशासनाने कारवाईचा बडगा उगरला आहे.

राज्य सरकारने अद्याप लाॅकडाऊनची घोषणा केलेली नाही, मात्र दोन ते तीन दिवसात याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी लाॅकडाऊनच्या भितीने खरेदीसाठी आज सकाळ पासूनच बाजारपेठेत गर्दी केली होती. सध्या जीवनावश्यक वस्तूंची सेवा सूरू ठेवण्यास प्रशासनाने परवानगी आहे. मात्र अन्य खरेदीसाठी बाजारपेठेत आज मोठी गर्दी झाल्याने शहरातील विविध ठिकाणी चांगलीच गर्दी झाली होती. त्यातच महाराष्ट्र चेंबर आॅफ काॅमर्सने राज्यातील व्यापारी आज पासून आपली दूकाने उघडतील असे सांगितल्याने व्यापार्‍यांनी सकाळपासून आपली दूकाने उघडली होती.बारा वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत गर्दी झाली होती.त्यानंतर पोलिस, महसूल व नगरपरिषद प्रशासनाने कारवाईला प्रारंभ केला.

कराड शहरातील मूख्य बाजार पेठेतील काही दूकांनावर कारवाई सूरू होताच दूकानदार व पोलिसांमध्ये वादावादीचे प्रसंग झाल्याचे पहायला मिळाले. प्रशासनाच्या या कारवाईने बाजारपेठेत व्यापारी, दूकानदार चांगलेच भडकले होते.

दरम्यान बाजारपेठेत कारवाई होत असल्याचे समजातच आझाद चौक,नेहरु चौक,चावडी चौक परिसरातील व्यापार्‍यांनी दूकाने बंद करीत दूकानापूढेच ठाण मांडली होती.अनेक दूकाने अर्धी उघडी ठेवण्यात आली होती.कमानी मारूती परिसर, प्रभात टाॅकीज परिसर,जनता व्यासपीठ परिसर,मूख्य भाजी मंडईत ही नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती.

Leave a Comment