वाहतूक पोलिसांचा दणका : साताऱ्यात वाहन चालकांना खाकी ड्रेसकोड बंधनकारक, ब्लॅक फिल्मिंग नो

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा वाहतूक शाखेच्या पोलिसांनी ब्लॅक फिल्मिंग असलेल्या चारचाकी गाड्यावर कारवाईला सुरुवात केली आहे. तर शहरात रिक्षा चालकांना खाकी ड्रेसकोड बंधनकारक केला आहे. ज्या रिक्षा चालकांकडे खाकी ड्रेस नाही त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यामुळे सातारा शहरात येताना वाहन चालकांनी चारचाकी गाडीचे ब्लॅक फिल्मिंग काढूनच प्रवेश करावा.

सातारा शहरातील पोवई नाका भागात चालू असलेल्या वाहतूक पोलिसांच्या कारवाईमुले काही गाड्यांचे ब्लॅक फिल्मींग स्वतः गाड्यांच्या मालकांनी स्वतःहून काढले. तर काहींना वाहतूक पोलिसांनी वाहन चालकांना काढायला लावले. वाहतूक पोलिसांच्या या अॅक्शन मोडमुळे ब्लॅक फिल्मिंग असणाऱ्या वाहन चालकांच्यात चांगलीत धास्ती निर्माण झालेली आहे.

सातारा शहरात प्रवाशांना सुरक्षित प्रवास होण्याच्या दृष्टीने अधिकृत रिक्षा चालक असावा, या उद्देशाने वाहतूक शाखेने ड्रेसकोड बंधनकारक केला आहे. जे वाहनचालक नियमांचे उल्लघंन करत आहेत, त्यांना दंड देखील आकारण्यात आला. यापुढे देखील ही कारवाई अशीच सुरू राहणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले.

Leave a Comment