Saturday, February 4, 2023

कराडातील सिग्नल यंत्रणेचा खेळखंडोबा ; नगरपालिका प्रशासन मात्र सुस्त

- Advertisement -

सकलेन मुलाणी | कराड

कराड शहरात वाहतुकीची कोंडी पाहायला मिळत आहे. अशावेळी शहरातील सिग्नल यंत्रणेचा खेळखंडोबा झाल्याचे दिसून येत आहे. कायम सिग्नल यंत्रणा बंद पडत असल्याने वाहनधारक सुसाट वेगाने धावत आहेत. अनेक चौकातील सिग्नल यंत्रणा केवळ नावापुरती असल्याचे दिसून येत आहे. कराड शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यात नगरपालिकेसह वाहतूक पोलीस प्रशासन सुस्त पडल्याचे चित्र प्रवाशांना पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

वाहतूक शाखेचे कर्मचारी वाहतुकीला शिस्त लावण्याचा ऐवजी केवळ पावत्या पाडण्याचे काम करत असल्याचे दिसून येत आहे. सिग्नल यंत्रणा व्यवस्थित करणे, वाहनचालकांना त्रास न होता प्रवास करता यावा. यासाठी उपाययोजना करण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अस मत प्रवाशांनी व्यक्त केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’