Wednesday, October 5, 2022

Buy now

दौंड तालुक्यात स्कूल बसला अपघात, विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू

बारामती : हॅलो महाराष्ट्र – दौंड तालुक्यातील पडवी या ठिकाणी आज सकाळी स्कूल बसचा मोठा अपघात झाला. विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन निघालेल्या स्कूलबसला चारचाकी गाडीने धडक दिल्यामुळे हा अपघात घडला आहे. या अपघातात सात वर्षीय विद्यार्थीनीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर एक विद्यार्थ्यांनी गंभीर जखमी झाली आहे.

या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनीचे नाव अवनी गणेश ढसाळ असे आहे. तर यामध्ये जखमी झालेल्या विद्यार्थिनीचे नाव मरिन तांबोळी असे असून तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह पाटस पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक केशव वाबळे, पोलीस समीर भालेराव व घनश्याम चव्हाण यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

कशा प्रकारे घडला अपघात ?
हाती आलेल्या माहितीनुसार, सुपे येथे असणाऱ्या इंग्लिश मिडीयम स्कूलसाठी विद्यार्थ्यांना घेऊन ही बस निघाली होती. यादरम्यान कुसेगाव ते पडवी येथे जाणाऱ्या अष्टविनायक महामार्गावरील पडवी मार्गावर एक चारचाकी आणि या स्कूलबसचा मोठा अपघात झाला. या अपघातात सात वर्षीय अवनी गणेश ढसाळ या विद्यार्थ्यांनीचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.