दुखःद ः सातारा जिल्ह्याच्या सुपुत्राला वीरमरण, सोमनाथ मांढरे यांचे आज पार्थिव येणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | वाई तालुक्यातील आसले गावचे सुपुत्र सोमनाथ मांढरे हे यांना देशसेवा बजावत असताना लडाख येथे वीरमरण आलेले आहे. लडाख येथे हवामानातील बदलामुळे त्यांना श्वासोश्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यातच ते बेशुद्ध झाले. त्यांना जवळच्या लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती तहसीलदार रणजीत भोसले यांनी दिली.

सोमनाथ यांना वीरमरण आल्याची माहिती शनिवारी सायंकाळी उशिरा कुटूंबियांना कळविण्यात आली आहे. देश सेवा करीत असताना अतिशय प्रतिकूल वातावरणाचा सामना करत असताना त्यांना हे वीर मरण आले. आसले (ता. वाई) येथील सोमनाथ मांढरे यांचे बंधू असलेले महेश मांढरे यांना याची माहिती कळविण्यात आली. सोमनाथ मांढरे यांना वीरमरण आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांच्या मागे त्यांची पत्नी आणि 8 वर्षाचा मुलगा व फक्त 10 महिन्याची मुलगी व लहान भाऊ असा परिवार आहे. हुतात्मा जवान सोमनाथ मांढरे यांचे पार्थिव आज पहाटे दिल्ली येथे पोहोचेल. सायंकाळ पर्यंत आसले या मूळ गावी पोहोचेल. त्यांच्यावर शासकीय इतमामात असले येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Leave a Comment