तृतीयपंथींना मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढाकार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | राज्यात निवडणुकीच्या तोंडावर अनेक राजकीय पक्षांचे तृतीयपंथींना पक्षात प्रवेश देेण्याचे सत्र सुरु आहे. वंचित बहुजन आघाडीत नुकतच दिशा पिंकी शेख यांनी काम सुरु केले. यामध्ये राष्ट्रवादी सुद्धा मागे नाही. तृतीयपंथीचे प्रश्न सोडवने आणि त्यांना समाजात आदराने सन्मानाने वागणुक मिळावी यासाठी समता प्रस्थापित करण्याचे आणि असे अनेक प्रश्न सोडविण्यासाठी राजकीय पक्षांनी पुढाकार घेतल्याचं दिसत आहे.

याचाच भाग म्हणून आज राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये राष्ट्रवादी नेत्या यांच्या उपस्थितीत तृतीयपंथी प्रिया पाटील यांचा पक्षात जाहिर प्रवेश झाला. पक्षाच्या पुरोगामित्वाची साक्ष पटवत तृतीयपंथी प्रिया पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश झाला. प्रिया पाटील यांच्या पक्षप्रवेशानंतर खा. सुप्रिया सुळे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.

खा.सुळे म्हणाल्या. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून तृतीयपंथीयांसाठी काम केले जाते व त्यात प्रिया यांची महत्त्वाची भूमिका आहे. राष्ट्रवादी हा सर्व समाजघटकांना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे. यावेळी प्रिया पाटील यांनी दिलेल्या पक्षाने राजकीय संधीबद्दल पक्षाचे आभार मानले. राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक समस्यांमध्ये बांधिलकी जपली आहे, आणि आपण पक्षाशी एकनिष्ठ राहू, अशी ग्वाही पाटील यांनी दिली. यावेळी राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे, नवाब मलिक, आदि पदाधिकारींसह अनेक मंडळी उपस्थित होती.

Leave a Comment