परिवहनमंत्र्यांसोबत एसटी कर्मचाऱ्यांची बैठक; तोडगा निघणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा 15 व दिवस आहे. आंदोलनात आज तोडगा निघणार असल्याची चिन्हे दिसत आहे. राज्य सरकारच्यावतीने परिवहनमंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना चर्चेसाठी बोलवले असून एसटी कर्मचारी सह्याद्री अतिथीगृहात दाखल झाले आहेत. थोड्याचवेळात बैठकीस सुरुवात होत आहे. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातून भाजप आमदार गोपीचंद पडळकर, शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या १५ दिवसांपासून राज्यभरातील एसटी कर्मचारी संपावर आहे. शहरी भागासह ग्रामीण भागात एसटीचे प्रवासी अधिक आहेत. अशातच एसटी बंद असल्यामुळं प्रवाशांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र, आता एसटीचे थांबलेले चाक पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. राज्य सरकार आणि संपकरी यांच्यात नुकत्याच झालेल्या एका बैठकीत पहिल्यांदाच दोन्हीकडून चर्चेसाठी पुढचं पाऊल टाकण्यात आलं आहे.

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेला दोन-तीन पर्याय दिले आहेत. त्यामध्ये अंतरिम वेतनवाढ देऊ शकतो. वाढ दिल्यानंतर समितीने एसटीच्या विलीनीकरणाचा निर्णय दिला, तर त्यानंतरही पगारवाढ दिली जाईल, असंही अनिल परब यांनी म्हटलं आहे. परब यांनी याबाबत सर्वस्वी निर्णय घेण्याचे एसटी कर्मचऱ्याना सांगितले आहे. त्यामुळे आता आज एसटी कर्मचाऱ्यांकडून बैठकीनंतर काय निर्णय घेतला जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Comment