दिवाळीला गावी जाण्यासाठी रेल्वेने प्रवास करताय ! मग ही बातमी वाचाचं

 

औरंगाबाद – दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव अवघ्या महिन्याभरात आवर आला आहे. या सणासाठी गावी जाण्यासाठी प्रवाशांकडून नियोजन केले जात असून, त्यासाठी रेल्वेचे आरक्षण केले जात आहे. रेल्वेचे आरक्षण करणाऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण ऑक्टोबर अखेरच्या काही दिवसातील रेल्वेचे आरक्षण फुल्ल झाले असून, वेटिंग कडे जात आहे. यामध्ये विशेषता मुंबई मार्गावरील रेल्वेचे आरक्षण आगामी दोन-तीन दिवसात पूर्ण होण्याची चिन्हे दिसत आहेत.

औरंगाबादमध्ये नोकरी, शिक्षण, व्यवसायानिमित्त वास्तव्यास असलेल्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमानावर आहे. दरवर्षी दिवाळी सणासाठी गावी जाण्याची ओढ त्यांना लागते. त्याच बरोबर दिवाळीच्या सुट्ट्या पर्यटनाचे देखील निवेदन नियोजन केले जाते. त्यासाठी रेल्वेचा प्रवास सुरक्षित मानला जातो. हा प्रवास सुखाचा व्हावा यासाठी अनेक दिवस आधीच नियोजन करून रेल्वेचे आरक्षण करण्यास प्राधान्य दिले जाते. आता घरबसल्या ऑनलाइन आरक्षण करून प्रवासी पुढील व्यवस्था करत असल्याने काही मार्गांवरील गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे.

कोणत्या गाडीची काय स्थिती ? (30 ऑक्टोबर) 

• आदिलाबाद – मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस 10 सीट उपलब्ध

• नांदेड – मुंबई राज्यराणी एक्सप्रेस 122 सीट उपलब्ध

• सिकंदराबाद – मुंबई देवगिरी एक्सप्रेस 15 सीट उपलब्ध

• जालना – मुंबई जनशताब्दी सुपरफास्ट एक्स्प्रेस 950 सीट उपलब्ध

• नांदेड – मुंबई तपोवन एक्स्प्रेस 1400 सीट उपलब्ध

सध्या सुरू असलेल्या ‘विशेष’ रेल्वे – 

• औरंगाबाद- हैद्राबाद- औरंगाबाद विशेष एक्सप्रेस

• सचखंड सुपरफास्ट एक्स्प्रेस

• हैदराबाद- जयपूर- हैदराबाद साप्ताहिक एक्सप्रेस

• देवगिरी एक्सप्रेस

• तपोवन एक्स्प्रेस

• नंदीग्राम एक्सप्रेस

•जनशताब्दी सुपरफास्ट एक्स्प्रेस

• ओखा- रामेश्वर- ओखा साप्ताहिक एक्सप्रेस

• नरसापूर- नगरसोल- नरसापूर एक्स्प्रेस

• अजंता एक्स्प्रेस

• तिरुपती- साईनगर शिर्डी- तिरुपती साप्ताहिक एक्सप्रेस

• साईनगर शिर्डी एक्सप्रेस

• राज्यराणी एक्सप्रेस

• रेणिगुंटा एक्सप्रेस