वराडे येथे पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातील वन्यजीवांसाठी उपचार केंद्र मंजूर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

वराडे (ता. कराड) येथे पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातील वन्य जीवांवर उपचार व देखभाल करण्यासाठी अत्याधुनिक वन्यजीव उपचार केंद्र मंजूर झाले आहे. त्यासाठी 7 कोटी 58 लाख रुपयांचा निधी नुकताच उपवनसंरक्षक सातारा यांचे कार्यालयाकडे वर्ग झाला आहे. खासदार श्रीनिवास पाटील व राज्याचे सहकार मंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे हे अत्याधुनिक वन्यजीव उपचार केंद्र मंजूर झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील वन्यजीवांना या केंद्राचा लाभ होणार आहे.

सध्यस्थितीमध्ये जखमी वन्य प्राण्यांवर उपचार करणे करताना पशुवैद्यकीय दवाखान्यातील उपलब्ध सुविधांचा वापर करावा लागतो. परंतु मूलतः वन्यप्राण्यांवर उपचार करणेकरता वेगळ्या सुविधांची आवश्यकता असते. वन्य प्राण्यांवर उपचर करताना कमीत कमी मानवी संपर्क व तातडीने उपचार करून लवकरात लवकर त्यांना मूळ अधिवासामध्ये सोडणे आवश्यक असते. या दृष्टीने आवश्यक उपचारपद्धती जसे की रेडिओथेरपी, पोटेबल एक्स-रे यांसारख्या अद्ययावत सुविधांनी हे उपचार केंद्र सुसज्ज असणार आहे. सदर उपचार केंद्रामध्ये मांस भक्षी प्राणी -पक्षी, तृणभक्षी प्राणी – पक्षी, तसेच जलचर प्राण्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून नैसर्गिक अधिवासशी मिळते – जुळते वातावरण तयार केले जाणार आहे.

राज्यातील दुसरे शासकीय ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर ः महादेव मोहिते

सहकार मंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. व्ही. क्लेमेंट बेन, मुख्य वनसंरक्षक एम. रामानुजम , मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, नाना खामकर यांच्या सर्वांच्या प्रयत्नातून परीश्रमामुळे पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच एक अत्याधुनिक वन्य प्राणी व पक्षी यांच्या उपचारासाठी ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर हे वराडे (ता. कराड) येथे सुरु होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रासाठी व सातारा जिल्ह्यासाठी हे केंद्र भूषणावह ठरेल. नागपूर नंतर महाराष्ट्रातील दुसरे शासकीय ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर असल्याचे सातारचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते सांगितले.

Leave a Comment