माणुसकी हरविली : ट्रकचा चालक ठार अन् लोकांनी पळविली पिशवीतून, पोत्यातून कलिंगडं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | सातारा जिल्ह्यातील शिंदेवाडी (ता.खंडाळा) गावच्या हद्दीत कलिंगडं घेऊन निघालेल्या ट्रकचा अपघात झाला. या अपघातात चालक ठार झाला असताना लोकांनी कलिंगड पळवून नेली, मात्र चालकांकडे लक्ष दिले नाही. उमेश महादेव मदने (वय-38, रा. नातेपुते, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असे मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे.

शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगळवारी रात्री 11.45 च्या सुमारास खंडाळा गावच्या हद्दीत भोर रस्त्यावर विजय लाॅनजवळ ट्रकचा (क्रमांक- एमएच- 12- केटी- 4986) अपघात झाला. अपघातानंर रस्त्यावरील प्रवाशांनी वाहनातील कलिंगडं पिशवीतून, पाेत्यातून तसेच हातातून नेली. कलिंगडं पळविण्यासाठी घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली हाेती.

या अपघातात ट्रकचा चालक ठार झाला आहे. ट्रकचे मोठे नुकसान झालेले असून पुढील बाजूचा चक्काचूर झालेला आहे. या अपघाताचा खंडाळा पाेलिस अपघाताचा तपास करीत आहेत.

 

Leave a Comment