ट्रक- दुचाकी धडक : तासवडे टोलनाक्याजवळ अतितचे दोनजण जखमी

कराड | कराड तालुक्यातील तळबीड- बेलवडे गावच्या हद्दित ट्रक दुचाकीच्या धडकेत अतित (ता. जि. सातारा) येथील दोनजण जखमी झाले आहेत. दुचाकी चालकांचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला असून जखमींना कराड येथे उपचासाठी हलविण्यात आले आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सातारा – कराड लेनवरती तासवडे टोल नाक्यानजीक रस्त्यांच्या बाजूला उभा असलेल्या ट्रक (क्र. MH-10-CR -1793) पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या मोटारसायकल (क्र. MH-11-CZ-0181) चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाला आहे. उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून दुचाकीने धडक दिली. त्या मध्ये दोघे जण जखमी झाले आहेत. हायवे रूग्णवाहिका बोलावून जखमींना कराड कृष्णा हाॅस्पिटल येथे दाखल केले आहे.

अपघात सोमवारी 12 वाजण्याच्या सुमारास झाल आहे. या अपघातात मिथुन राठोड (वय- 25) हा गंभीर जखमी झाला आहे. तर दिपक लालासो चव्हाण (वय- 22 दोघे रा.अतित, ता. जि. सातारा) किरकोळ जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच हायवे हेल्पलाइन पेट्रोलिंग इन्चार्ज दस्तगीर आगा, जितेंद्र भोसले, प्रकाश गायकवाड तसेच महामार्ग पोलिस ट्रॅफिकचे कर्मचारी व अधिकारी तळबीड पोलिस स्टेशनचे कर्मचारी यांनी मदत केली.

You might also like