राष्ट्रीय महामार्गावर टोमॅटोचा टेम्पो पलटला, रस्त्यावर टोमॅटोचा खच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वर वाहनावरील ताबा सुटल्याने टोमॅटोने भरलेला ट्रक पाथरी परभणी दरम्यान असलेल्या कोल्हा पाटीवर पलटी झाल्याची घटना सोमवार ६ मे रोजी सकाळी घडलीय .

औरंगाबाद येथुन एम .एच .20 डि .ई.9079 क्रंमाकाचे आयशर ट्रक परभणी कडे टोमॅटो ने भरलेले क्रेट घेऊन आला होता. दरम्यान कोल्हा पाटी जवळील वळण रस्तावर चालकाचा वाहनावरिल ताबा सुटल्याने सदरील ट्रक पलटी झाले.

या घटनेत चालक जखमी झालाय. जखमीं चालकास अॅम्बलंसद्वारे पुढील उपचारासाठी परभणीला हलविले आहे. अपघातानंतर रस्त्यावर टोमॅटोचा खच पडला होता.

Leave a Comment