गणेशोत्सव स्पेशल | तुळशीबाग गणपतीबाबत तुम्हाला ही माहिती आहे का ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र | पुण्यातील मानाच्या ५ गणपतीमध्ये तुळशीबाग गणपतीचा समावेश आहे. तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळाचा गणपती हा उत्कृष्ट देखाव्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे गणेशोत्सवामध्ये या गणपतीच्या दर्शनाला आणि या गणपतीचा देखावा पाहण्यासाठी खूप गर्दी असते. दक्षित तुळशीबागवाले यांनी १९०० साली या गणेशोत्सवाची उत्सव सुरुवात केली. यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपण तुळशीबाग गणपती विषयी अधिक माहिती जाणून घेऊ.

तुळशीबाग गणेश मंडळाची मूर्ती फायबरची आहे. ज्येष्ठ मूर्तीकार डी. एस. खटावकर हे अनेक वर्षांपासून या गणपतीची आरास करतात. तुळशीबाग गणपती हा मानाचा चौथा गणपती आहे. या गणपतीची स्थापना १९०१ मध्ये करण्यात आली. १९७५ पहिल्यांदामध्ये फायबरच्या गणेश मुर्तीची स्थापना करण्याचा मान या मंडळाला जातो.

तुळशीबागेतल्या मोक्याच्या आणि वर्दळीच्या भागात हा गणपती बसतो. १३ फुट उंचीची ही गणेशमुर्ती अतिशय आकर्षक आणि मनोवेधक आहे. या गणपतीला ८० किलो वजनाचे चांदीची आभुषणे आहेत. कलाकार डी.एस. खटावकर गेली अनेक वर्षे या गणपतीची सजावट करत आहेत. त्यामुळे वर्षनुवर्षं या गणपतीची मूर्ती अजूनच आकर्षक दिसत आहे.

Leave a Comment