धार्मिक प्रचाराच्या नावाखाली 1000 मुलींचे लैंगिक शोषण ; कोर्टाने ठोठावली तब्बल 1075 वर्षांची शिक्षा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | धार्मिक प्रचाराच्या नावाखाली लैंगिक शोषण, फसवणूक आणि गुन्हेगारी टोळी निर्माण करणाऱ्या एका इस्लामी टीव्ही प्रचारक आणि लेखकाला तब्बल 1075 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. हा धर्मप्रचारक मूळचा तुर्कस्तान देशातील आहे. तुर्कस्तान येथील सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्याविरोधात लैंगिक शोषण, फसवणूक तसेच इतरही अनेक गुन्हे नोंदवण्यात आले असून अदनान ओक्तार असे त्याचे नाव आहे.

त्याच्यावर असा आरोप आहे की, तो नेहमी अर्धनग्न स्त्रियांच्या गराड्यात राहत असे. या बायकांना त्यानं Kittens असं नाव ठेवलं होतं. मनुष्याच्या जन्माची रहस्य, आणि परंपरागत विचारांचा उपदेश तो प्रवचनातून करत असे, या प्रवचनाच्या दरम्यानही त्याच्या सभोवताली अर्धनग्न स्त्रिया नृत्य करत असत. यामधील काही महिलांनी प्लॅस्टिक सर्जरी देखील केली होती.

दरम्यान, अदनानवरील खटल्यांच्या सुनावणी दरम्यान एका महिलेनं त्यानं लैंगिक शोषण केल्याची साक्ष दिली होती. लैंगिक शोषण केल्यानंतर गर्भनिरोधक गोळ्या घेण्यासाठी अदनान महिलांना जबरदस्ती करत असे. पोलिसांनी त्याच्या घरातून 69 हजार गर्भनिरोधक गोळ्या हस्तगत केल्या आहेत.

डिसेंबरमध्ये खटल्याच्या वेळी, ओक्तारने न्यायाधीशांना सांगितले की त्याच्या 1000 गर्लफ्रेंड्स आहेत. त्याच वेळी, ऑक्टोबरच्या सुरुवातीस, दुसऱ्या एका सुनावणीत तो म्हणाला होता की, ‘माझ्या मनात स्त्रियांबद्दलचे प्रेम वाढते. प्रेम ही मानवी भावना आहे, मुसलमान असण्याचा हा गुण आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment