Wednesday, March 29, 2023

दिल्ली निवडणुकीत रंगला आर्ट विरुद्ध आर्टिस्टचा सोशल ट्रेण्ड; भाजपवर उलटला डाव

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिल्ली विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु असताना आर्ट विरुद्ध आर्टिस्ट (Art vs Artist) या भाजपच्या आयटी सेलने सुरु केलेल्या मोहिमेचा फज्जा उडताना दिसत आहे. प्रत्यक्ष परिस्थिती आणि मोदींनी केलेलं काम यावर सोशल मीडियाचा आधार घेऊन भाजपने अरविंद केजरीवाल यांना टार्गेट करायचा प्रयत्न केला. मात्र ही शक्कल भाजपच्या विरुद्ध जाणार असं एकूण सोशल मीडिया ट्रेन्डसवरुन दिसून येत आहे.

Untitled design (23)

- Advertisement -

दिल्लीतील वाढलेल्या वाहतुक कोंडीला जबाबदार कोण तर अरविंद केजरीवाल असा एक आर्ट व्हर्सेस आर्टिस्ट संदेश टाकण्यात आला आहे. या टीकात्मक संदेशानंतर कलम 370, CAA यांचे आर्टिस्ट म्हणून मोदींचा फोटो वापरण्यात आला आहे. याची प्रसिद्धी जास्त होईल असं वाटत असतानाच भाजप विरोधकांनी आर्ट व्हर्सेस आर्टिस्टला त्याच पद्धतीने रिप्लाय द्यायला सुरुवात केली आहे.

Untitled design (24)

बेरोजगारी, आर्थिक मंदी, दंगली यांचे आर्टिस्ट नरेंद्र मोदी आहेत अशा आशयाच्या प्रतिमा लोकांकडून सोशल मीडियावर टाकल्या जात आहेत. यामध्ये नरेंद्र मोदींसोबत अमित शहा, अमित मालवीय, लालकृष्ण आडवाणी यांनासुद्धा टार्गेट करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर हा ट्रेंड धुमाकूळ घालत असताना याचा फायदा आता नक्की कुणाला होणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”

हे पण वाचा-

काँग्रेस कार्यकर्त्याची अशीही पक्षनिष्ठा; मुलाचे नाव ठेवलं काँग्रेस

‘नाइट लाईफ’वर टीका करणारे प्रदूषित मनाचे; आदित्य ठाकरेंची जोरदार टीका

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केजरीवाल यांना तब्बल ६ तास रांगेत उभं राहावं लागलं