माणगावात सापडले 8 जिवंत गावठी बॉम्ब, दोन आरोपींना अटक

माणगाव : हॅलो महाराष्ट्र – रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात असणाऱ्या पाणसई आदिवासी वाडीत पोलिसांनी छापा टाकून आठ गावठी बॉम्ब (bomb) जप्त केले आहेत. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या धाडीत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर या गावठी बॉम्बचे (bomb) कनेक्शन थेट मध्य प्रदेशमध्ये असल्याचे तपासात समोर आले आहे. माणगाव पोलीस ठाणे हद्दीत मौजे पाणसई येथे गावठी बॉंब (bomb)तयार करण्याचे साहित्यासह दोन आरोपींना माणगाव पोलीस ठाण्याकडून अटक करण्यात आली आहे.

बाबू दगडू जाधव व राम यशवंत वाघमारे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ते रानडुकराची शिकार करण्याकरीता वापरण्यात येणारे गावठी बॉंब (bomb) तयार करत होते. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे माणगाव तालुक्यातील मौजे पाणसई आदिवासी वाडी येथे छापा टाकला. या छाप्यात एका प्लॅस्टिकच्या बरणीत ठेवलेले लहान सुपारीच्या आकाराचे 8 गावठी बॉम्ब, एका प्लॅस्टिकच्या पिशवीत सुमारे 2 किलो वजनाची पिवळ्या, काळ्या, लाल रंगाची पावडर, स्फोटक पदार्थ तयार करण्याकरीता वापरण्यात येत असलेले 100 ग्रॅम वजनाचे प्लॉस्टिक आढळून आले.

यानंतर पोलिसांनी हे सगळे साहित्य जप्त करून दोन आरोपींना अटक केली. याप्रकरणी आरोपीं विरोधात माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एन.डी.लहांगे हे करीत आहेत. या दोन आरोपींची कसून चौकशी केली असता चासलाल नावाचा इसम गावठी बॉम्ब (bomb) तयार करण्याकरीता लागणारे साहित्य पुरवतो, तसेच स्वत:ही तयार करून विकतो. या चासलालबद्दल विचारले असता तो मध्य प्रदेश येथील रहिवासी असून त्याचा शोध घेण्यासाठी माणगाव पोलिसांचे पथक नेमण्यात आले आहे.

हे पण वाचा :
एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे अनेक शिवसैनिक नाराज, जोरदार घोषणाबाजी करत व्यक्त केला संताप

भिवंडीत कॅशियरनेच बारमधील गल्ल्यावर मारला डल्ला, CCTV फुटेज आले समोर

दुचाकीसह पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडाले पती-पत्नी, Video आला समोर

बनावट क्रिप्टो एक्सचेंजने फ्रॉडद्वारे भारतीय गुंतवणूकदारांचे लुटले 1000 कोटी रुपये – रिपोर्ट

पुढंच्या एका तासात राज्यात काय घडत बघा; राणेंचा इशारा