चैन स्नॅचिंग करणाऱ्या दोघांना अटक : तीन गुन्हे उघडकीस, 75 हजार 900 रूपयांचा मुद्देमाल जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून चैन स्नॅचिंग करणारी टोळी जेरबंद करण्यात आली आहे. या टोळीकडून चैन स्नॅचिंगचे 3 गुन्हे उघडकीस आणत 75 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले आहे. या प्रकरणी दोन संशयितांना अटक केली असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरचे गुन्हे उघडकिस आणणेचे अनुषंगाने शाहुपुरी पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक हद्दीत पेट्रोलिंग करत असतांना त्यांना जुना मोटार स्टॅड येथील ज्वेलर्स दुकानाचे येथे दोन इसम संशयितरित्या उभी असल्याचे दिसले. गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदारांनी दोन्ही इसमांकडे विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. नमुद संशयित इसमांची झडती घेतली असता त्यांचेकडे सोन्याचे दागिने मिळून आले. सदर दागिन्यांबाबत गुन्हे पथकाने विचारपूस केली असता दोन्ही इसमांनी समाधानकारक माहीती दिली नाही. सदरचे दागिने चोरीचे असल्याबाबत संशय आल्याने त्या इसमांकडे मिळून आलेले सोन्याचे दागिने, बजाज मोटारसायकल वगैरे 75 हजार 900 रूपये किंमतीचा मुद्देमाल असे जप्त करणेत आले. सदरील संशयिता विरुदध शाहुपुरी पोलीस ठाणेत गुन्हा नोंद करुन त्यांना अटक करणेत आली.

सदर गुन्हयाचे तपासामध्ये गुन्हे प्रकटीकरण शाखेने आरोपीकडे कौशल्याने विचारपूस केली असता आरोपींनी रेवडी गावचे हद्दीत, इस्लामपुर (जि.सांगली) हद्दीत, वेचले (ता.जि.सातारा) गावचे हद्दीत असे तीन ठिकाणी चैन स्नॅचिंगचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली. शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक व जि.वि.शा. यांचे पथकाने संयुक्त कारवाई करत आरोपीकडे कौशल्याने तपास करुन जिल्हयातील व परजिल्हयातील एकुण 3 चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकिस आणुन चेन स्नॅचिंग करणारी टोळी जेरबंद केली आहे. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक, सातारा अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक धिरज पाटील, सहा.पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक संजय पतंगे सहा.पोलीस निरीक्षक संदिप शितोळे, पो.हेड.कॉ. हसन तडवी, पो. नाईक लेलेश फडतरे, अमित माने, स्वप्निल कुंभार , पोकाॅ पंकज मोहिते, ओंकार यादव, मोहन पवार व जिल्हा विशेष शाखेचे पो.नाईक राकेश खांडके व पो.हे.कॉ. शेलार यांनी केली आहे.

Leave a Comment