घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर करणारे दोघे जेरबंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – घरगुती गॅस वापराचा उपयोग रिक्षात इंधनासाठी करत असलेले दोघांना गुन्हे शाखेच्या टीमने जेरबंद केले. त्यांच्याकडून गुन्हे शाखेच्या पथकाने 3 लाख 74 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल ढोमे यांनी दिली.

गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक गजानन सोनटक्के यांच्या पथकाला सिल्क मिल कॉलनी समोर हमिदिया गार्डन कॉलनीतील एक गाळ्यात आरोपी शेख बाबर शेख रशीद (22) आणि सचिन श्रीकांत गांगुर्डे (21) हे विनापरवाना बेकायदेशीर रीत्या घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर मधून इलेक्ट्रॉनिक मोटर च्या साह्याने पाईप जोडणी करून ऑटोरिक्षा करताना आढळून आले. या छाप्यात गुन्हेशाखेच्या पथकाने नऊ गॅस सिलेंडर, दोन मोटारी, वजन काटे, ऑटोरिक्षा असा एकूण 3 लाख 74 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणात दोन आरोपींच्या विरोधात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई उपनिरीक्षक सोनटक्के यांच्यासह सहायक उपनिरीक्षक विठ्ठल जवखेडे, नाईक पर्भत म्हस्के, अंमलदार संदीप बिडकर, नितीन बिडकर, नितीन धुळे, लखन गायकवाड, नितीन देशमुख यांनी केली.

Leave a Comment