घरातून 3 मोबाईल चोरणाऱ्या दोघांना अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : घराच्या उघड्या दरवाजातून तीन मोबाईल चोरणाऱ्या दोघांना मुकुंदवाडी पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. वानखेडे यांनी दोघांना मंगळवार पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश रविवारी दिले.

कार्तिक श्रीनिवास वय 23, आणि गुना बापू गोपाल वय 22, (रा. पणेर कुटाई जि. वेल्लोर तामिळनाडू) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात केलास (रमेश हनवते रा. अंबिकानगर), मुकुंदवाडी यांनी तक्रार दिली. त्यानुसार, फिर्यादीचा भाऊ विलास हा 10 मे रोजी ड्युटीला गेला. त्याचवेळी सर्व कुटुंब झोपेत असताना चोरट्यांनी संधी साधत घरातून तीन मोबाईल चोरून नेले.

या प्रकरणात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करून वरील दोघांना अटक केली. त्याची चौकशी केली असता, आरोपींनी मोबाईल विक्री केल्याची माहिती पोलिसांना दिली. आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयात सहाय्यक सरकारी वकील अमीर काजी यांनी युक्तिवाद केला.

Leave a Comment