धक्कादायक ! जिलेटीन कांड्याचा स्फोटात जिंतुरमध्ये दोन बालक गंभीर जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी : हॅलो महाराष्ट्र – परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरांमध्ये कचराकुंडी मध्ये सापडलेल्या जिलेटिन कांड्या मोबाईल बॅटरी सोबत जोडताच झालेल्या स्फोटामध्ये दोन बालके गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. शहरातील नवीन एकलव्य शाळा परिसरात राहणारा विद्यार्थी शेख असलम वय 11 वर्ष व अनस शाहेद पठाण हे दोघेजण घराजवळ खेळत असताना रस्त्याच्या बाजूला कचऱ्यात मोठ्या प्रमाणात वायर असलेल्या कांड्या दिसून आल्या.

यावेळी दोघांनी सदरील जिलेटीन कांड्या उचलून जुन्या मोबाईलच्या बॅटरीला वायर जोडले असता जिलेटीन कांडी फुटल्याने मोठा आवाज झाला .यावेळी अस्लम शेख याच्या हातात जिलेटीन असल्यामुळे संपूर्ण हाताला व डोळ्याला तर जवळच असलेल्या अनस पठाण याच्याही डोळ्याला गंभीर इजा झाली होती.

यावेळी परिसरातील नागरिकांनी दोघा जखमींना तातडीने शहरातील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. जखमींवर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे .दरम्यान जिलेटीन सारख्या स्फोटक शहरातील नागरीवस्ती सापडल्याने नागरिकांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून महसूल व पोलीस प्रशासन याबाबत अनभीज्ञ असल्याचे दिसून आले आहे.

Leave a Comment