आम्ही दोघी मैत्रिणी लाडाच्या..! नटून थटून पार्टीत नाचत एकमेकींना दारू पाजणाऱ्या मैत्रिणींचा व्हिडीओ वायरल

वायरल व्हिडीओ : सोशल मीडियावर आजकाल दररोज नवनवीन व्हिडीओ येत असतात. विविध फंडे आजमावून हे लोक प्रसिद्धीच्या एक एक पाऊल पुढे जातात. यातील काही व्हिडीओ तर अबब म्हणण्याइतके चर्चेत असतात. तर काही व्हिडीओ पाहून लोक राग व्यक्त करतात कधी आनंद व्यक्त करतात. सध्या असाच एक दोन मैत्रिणींचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून अनेकजण त्यांच्या बिन्दास्त असण्याचे कौतुक करत आहेत. तर अनेकजण त्यांच्या व्हिडिओवर आक्षेपार्ह प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडीओमध्ये या दोन महिला एकमेकींना चक्क दारू पाजत आहेत, असे स्पष्ट दिसत आहे. एकाच बॉटलने दारू पिणाऱ्या या मैत्रिणींचा व्हिडीओ पाहून लोक विविध प्रकारे व्यक्त होत आहेत.

 

https://www.instagram.com/reel/CPzgTCjHH21/?utm_source=ig_web_copy_link

 

सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ एका सेलिब्रेशन पार्टीमधील असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओमध्ये काही लोक एकदम कडक इस्त्री आणि सुटाबुटात दिसत आहेत. तर समोरच्या दोन महिलांनीसुद्धा अगदी मोहक असे आकर्षक ड्रेस आणि मेक अप परिधान केले आहेत. या पार्टीमध्ये सुरु असलेल्या गाण्यावर व्हिडीओतील या दोन्ही मैत्रिणी चांगल्याच थिरकत आहेत. विशेष म्हणजे या दोघीही कुण्या तिसऱ्याच विचार न करता अगदी आनंदी दिसत आहेत. दरम्यन एका मैत्रिणीच्या हातामध्ये दारूची बॉटल आहे. ती थोड्या वेळाने हसत हसत आपल्या मैत्रिणीला दारू पाजत आहे.

यानंतर दुसऱ्या महिलेनेही दारूची बॉटल आपल्या हातात घेतली आणि आपल्या पहिल्या मैत्रिणीला परत दारू पाजल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. या दोन्ही मैत्रिणी किंतु परंतु न आणता मजेत दारु पिण्याचा आनंद घेत आहेत. या व्हिडिओसोबत वो दिन असे कॅप्शनही देण्यात आलेले आहेत.
हे पाहून त्यांच्या बिनधास्त वृत्तीमुळे लोक त्यांची सोशल मीडियावर प्रशंसा करत आहेत. तर काही महिला स्वातंत्र्याशी सहमत नसणारे मात्र अतिशय नाराज झाल्याचे दिसत आहे. दरम्यान हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे अद्याप समजलेले नाही. मात्र, हा व्हिडीओ सोशल मीडिया इंस्टाग्रामवर fashionista_by_akanksha या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

You might also like