मोबाईलच्या ग्राहकांवरून दोन गटात तुंबळ हाणामारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | पैठण गेट हे ठिकाण औरंगाबाद शहरातील मोबाईल ग्राहकांसाठी मोठी बाजारपेठ आहे. महाराष्ट्रात तसेच औरंगाबाद शहरामध्ये लॉकडाउन सुरु आहे आणि त्यामध्ये ही सर्व दुकान बंद आहे. त्यामुळे दुकान चालकांनी आता नवीन कार्यपद्धती काढली आहे.

दुकानासमोर पन्नास रुपये देऊन मुलांना बसवले जाते आणि रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना तो मुलगा, “क्या लग रहा है चार्जर है हेडफोन है मोबाईल है” असे विचारणा करतो.

त्याच मुळे रस्त्यावरील चालणाऱ्या एका नागरिकाला बोलवण्यात आले आणि दोन दुकान चालकांमध्ये हा माझा गिर्‍हाईक आहे हा माझा गिराईक आहे म्हणून बघता बघता 50 ते 60 जणांची गर्दी जमा झाली.

या गर्दीचे रुपांतर भांडणात झाले त्यानंतर पोलिसांना याची चाहूल लागताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर लाठीचार्ज करत पैठण गेट येथील दुकान व्यावसायिकांचा जमाव पळवून लावला.

Leave a Comment