सातारा प्रतिनिधी | पोपट बनसोडे
महाराष्ट्र पोलीस दलात दोन महत्वाच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सातारचे तत्कालीन पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची पुणे वाहतुक विभागाच्या उपायुक्त पदी बदली करण्यात आली आहे तर पुणे वाहतूक विभागाच्या उपायुक्तपदी असलेल्या तेजस्वी सातपुते यांची साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी श्वेता सिंघल या आहेत. त्यातच साताऱ्यात सातपुतेंच्या नेमणुकीमुळे प्रशासनात महिलाराज अवतरला आहे. साताऱ्यात दोन महिला अधिकारी तेथील राजेशाहीला कशा सामोऱ्या जातील हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे. मीरा बोरवणकर यांच्यानंतर साताऱ्याच्या पोलीस अधीक्षक झालेल्या तेजस्विनी सातपुते या दुसऱ्या महिला आहेत.
येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील राजकीय घडामोडींवर सातपुते कशाप्रकारे लक्ष ठेवतील हे पाहून रंजक ठरणार आहे. त्यांनी आपल्या धडाकेबाज कार्यशैलीने पुण्याच्या वाहतुकीला चांगलीच शिस्त लावली आहे. आता साताऱ्यात कशी शिस्त लावतात हे पाहता येईल
इतर महत्वाचे –
उदयनराजेंकडून भाजप सरकारची स्तुती, राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ
आता तुमचेच विसर्जन करण्याची वेळ आली आहे, शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना टोला
शरद पवारांनी मला कळकळून मिठी मारली आणि सांगीतलं तुम्ही आमचेच आहात – उदयनराजे भोसले