सोशल मीडियावरील चॅटींगवरून दोन गटात झालेल्या हाणामारीत दोघांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

जत तालुक्यातल्या उमदी येथे सोशल मीडियावर चॅटींग केल्याचे राग मनात धरून दोन गटात झालेल्या तुफान हाणामारीत दोन तरुणांचा निर्घृण खून झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये एक तरुण गंभीर जखमी असून त्या तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे. त्यास सोलापुर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी तरुणाला दाखल केले आहे. गुंडु उर्फ मदगोंडा नागाप्पा बगली, संतोष राजकुमार माळी अशी मयत तरुणाची नांवे आहेत. तर प्रकाश महादेव परगोंड हा गंभीर जखमी झाला आहे.

ही घटना मंगळवारी रात्री साडे अकरा वाजता गावापासून महामार्गावर पादगट्टी याठिकाणी घडली. घटनास्थळी पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, उपविभागीय अधिकारी रत्नाकर नवले, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सर्जेराव गायकवाड यांनी भेट दिली. मयत बगली, माळी व जखमी परगोंड हे वर्गमित्र आहेत. गावात शिवजयंतीचा सार्वजनिक कार्यक्रमा दिवशी स्टेजवर बसण्याच्या कारणावरुन सोशल मिडीयावर चँटीगवरुन वाद झाला होता.

त्यानंतर संशयित व मयत यांच्या गटात मंगळवारी पुन्हा सोशल मिडियाच्या चँटींगवरुन वाद पुन्हा झाला. एकमेकांना बघून घेण्याची धमकी देण्यात आली. त्यावेळी स्थानिकांनी धाव घेत दोन्ही गटाना शांत केले व उद्या वाद मिटवू असे सांगून पाठवून दिले. मात्र, त्यानंतर रात्री मंगळवेढा तालुक्याच्या सीमेवरील धाब्यावर मयत व त्यांची मित्र मंडळी जेवायला गेले होती. त्यांच्यावर संशयित दहा ते बाराजण आरोपी पाळत ठेवून होते.

रात्री साडे अकरा वाजता जेवण करुन येताना संशयितानी आरोपीनी त्यांच्यावर काठी, धारधार शस्त्र, दगडाने मारहाण केली. मारामारीत गुंडा बगली, संतोष माळी यांच्या पोटावर, अंगावर धारदार शस्त्राने वार झाले होते. मोठ्या प्रमाणात रक्तश्राव झाला तर प्रकाश महादेव परगोंड हा गंभीर जखमी झाले होते. तिघांना सोलापूरला नातेवाईकांनी हलवले. उपचाराला घेऊन जाताना मदगोंडा बगली, संतोष माळी या दोघांचा वाटेत मृत्यू झाला. पोलिसांनी संशयित बारा जणांना ताब्यात घेतले आहे.

Leave a Comment