Monday, January 30, 2023

ट्रॅक्टर उलटून दोघांचा मृत्यू, बारड मार्गांवरील घटना

- Advertisement -

नांदेड : ट्रॅक्टर उलटून दोघे ठार झाल्याची घटना बारड मार्गावर घडली. हा अपघात शुक्रवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुरुवातीला झाला आहे.भोकर फाटा बारड रस्त्यावरील खैरनार पाटीजवळील कॅनोलजवळ ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात दोन तरुण ठार झाल्याची घटना घडली आहे. तुषार सूर्यभान कळणे, पुरभाजी मारोतराव गिरे, असे या मृतांची नावे आहेत.

भोकर फाटा बारड रस्त्यावरील खैरनार पाटी परिसरातील तुकाराम पेट्रोल पंपाच्या समोरील कच्च्या रस्त्यावरून शुक्रवारी दुपारी ट्रॅक्टर जात असताना अचानक ट्रॅक्टर उलटून अपघात झाला. यात ट्रॅक्टर वरील चालक पुरभाजी गिरे आणि त्यांच्यासोबत असलेल्या तुषार सूर्यभान कळणे या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच बारड महामार्ग सुरक्षा पथकाने शेख, स्वाधीन ढवळे, संतोष वागतकर, अमोल सातारे हे घटनास्थळी दाखल झाले.

- Advertisement -

नागरिकांच्या मदतीने ट्रॅक्टरला क्रेनच्या सहाय्याने सरळ करण्यात आले. या प्रकरणी तेजस गिरी यांनी केलेल्या फिर्यादीवरून अर्धापूर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शेतीची कामे आटपून दोघे येत होते. त्याचवेळी अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.