चंद्रपूरमध्ये अनियंत्रित कारची झाडाला धडक होऊन भीषण अपघात, दोघांचा मृत्यू तर 3 जण जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चंद्रपूर : हॅलो महाराष्ट्र – चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शहराजवळच्या विद्या निकेतन कॉन्व्हेंट मार्गावर होंडा सिटी कारचा भीषण अपघात (Accident) झाला आहे. यामध्ये कारची झाडाला धडक झाल्यामुळे हा भीषण अपघात (Accident) झाला आहे. या अपघातात 2 तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. सनी वाधवानी आणि शुभम कापगते अशी या अपघातात (Accident) मृत पावलेल्या तरुणांची नावे आहेत. तसेच या अपघातात (Accident) जखमी तरुणांवर ब्रम्हपुरी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

कार अनियंत्रित झाल्याने अपघात
मृत तरुण आणि जखमी सर्व युवक होंडा सिटी कारने ब्रम्हपुरीकडे चालले होते. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शहरालगत वडसा मार्गावर असलेल्या विद्या निकेतन कॉन्व्हेंट येथे वेगवान कारने झाडाला धडक दिली. गाडीचा वेग जास्त असल्यामुळे कारचालकाला कार कंट्रोल करता आली नाही आणि कार झाडावर आदळली. या अपघातात (Accident) वडसा येथील 2 युवक जागीच ठार झाले तर 3 युवक गंभीर जखमी झाले आहेत. मृत मयत सनी वाधवानी आणि शुभम कापगते दोघेही वडसा येथील रहिवासी आहेत.

सोलापुरात एसटी आणि डंपरमध्ये अपघात
काही दिवसांपूर्वी कुर्डुवाडी-पंढरपूर रोडवर एसटी बसला डंपरने विरुद्ध दिशेने येऊन जोरदार धडक दिल्यामुळे अपघात (Accident) झाला होता. ही घटना कुर्डूवाडीच्या पंढरपूर चौकातील लक्ष्मी मंगल कार्यालयासमोर घडली होती. या अपघातात (Accident) एसटी चालक प्रकाश तुकाराम मुंडे यानी प्रसंगावधानता दाखवल्याने एसटीतील 15 प्रवाशांचे प्राण वाचले होते.

हे पण वाचा :
BSNL च्या ‘या’ ब्रॉडबँड प्लॅनमध्ये 100 Mbps स्पीडसह मिळवा OTT बेनेफिट्स !!!

हिंगोलीत जुन्या वादातून मुलांनी जन्मदात्या वडिलांला संपवलं

भंडाऱ्यात मानसिक रुग्न महिलेने मंदिरात हनुमानाचा चांदीचा डोळा चोरला, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

Aadhar card शी संबंधित फसवणूक कशी टाळावी???

रस्त्यावर झालेल्या वादानंतर कार चालकाने दुचाकीस्वाराला उडवले, धक्कादायक व्हिडिओ आला समोर

Leave a Comment