विमान तळावर दोन बिबटे आढळून आल्याने विमान सेवा बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव प्रतिनिधी | वाल्मिक जोशी 

विमानतळावर गेल्या काही दिवसांपासून दोन बिबटे आढळून आल्यामुळे विमानतळ बंद असून वनविभागाकडून बिबटे पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी नवनिर्वाचीत खासदार उन्मेष पाटील यांच्यासह विमानतळाला भेट देऊन वनविभागाने केलेल्या उपाययोजनांची पाहणी केली.

लोकसभा निवडणुकीनंतर नूतन खासदारांना केंद्र सरकारशी संबंधीत जिल्ह्यातील विषयांची माहिती व्हावी, यासाठी अजिंठा विश्रामगृहावर महामार्ग, विमानतळ, बीएसएनएल आदी विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासह नवनिर्वाचित खासदार उन्मेष पाटील हे उपस्थित होते. त्यांनी या विभागांकडील जिल्ह्यात सुरू असलेली तसेच रखडलेल्या कामांची माहिती घेतली. यावेळी विमानतळावर दोन बिबटे आढळल्याने विमानतळ बंद असल्याचा मुद्दा पुढे आला. त्यामुळे बैठक आटोपताच जलसंपदामंत्री महाजन हे आमदार, खासदारांच्या ताफ्यासह दुपारी ४ वाजता विमानतळावर दाखल झाले.

विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी तसेच जळगाव वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एन.जी. पाटील उपस्थित होते. बिबट्याबाबत घेतली माहिती गिरीश महाजन यांनी यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून बिबट्या कुठून विमानतळावर येतो? किती बिबटे आहेत? आदी माहिती घेतली. वनविभाग व विमानतळ प्राधिकरणाच्या अधिका यांनी ट्रॅप कॅमेयात आढळलेले दोन बिबट्यांचे चित्रणही महाजन व उपस्थित आमदार, खासदारांना दाखविले. तसेच दोन पिंजरे लावण्याची परवानगी मिळाली असून तेच काम सुरू करण्यात येत असल्याचे सांगितले. दोन पिंजरे लावले या बैठकीनंतर वनविभागाच्या अधिका यांनी दोन्ही बिबट्यांना पकडण्यासाठी दोन पिंजंरे विमानतळावर लावले. त्यात सावजही ठेवण्यात आले आहे.

Leave a Comment