Wednesday, June 7, 2023

बीडमध्ये महिलेची छेड काढून व्हिडिओ शूट केल्यामुळे संतप्त जमावाची दोघांना बेदम मारहाण

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये महिलेची छेड काढून व्हिडिओ शूट करणाऱ्या दोन संशयितांना जमावाने बेदम मारहाण (fight) केली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या प्रकरणी मारहाण (fight) करण्यात आलेल्यांना जबर जखम झाली असून त्यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

काय आहे प्रकरण ?
पीडित महिला पाण्यासाठी गेली होती. त्यावेळी या महिलेची छेड काढण्यात आली. छेड काढत व्हिडीओ रेकॉर्डिंगही करण्यात आले होते. यामुळे संतप्त झालेल्या जमावाने दोघा जणांना चांगलाच चोप (fight) दिला आहे. छेड काढणाऱ्यांना जमावाने लाथाबुक्क्यांनी तुडवले आहे. यावेळी मोठा गोंधळ निर्माण झाला होता. ही संपूर्ण घटना जमावापैकी एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये कैद केली आहे.

हि संपूर्ण घटना बीड तालुक्यातील कामखेडा गावामध्ये घडली आहे. या याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. सर्वात पहिले त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली नंतर या बाचाबाचीचे हाणामारीत रूपांतर झाले. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

हे पण वाचा :

तुम्हाला नवाबभाई चालतात पण मुन्नाभाई चालत नाहीत…; राणेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

तुमचा नगरसेवक असलेल्या एखाद्या वॉर्डात फिरुन दाखवा; खासदार जलील यांचे फडणवीसांना आव्हान

केतकी चितळेचा अभिमान वाटतो ; सदाभाऊ खोत यांचे केतकीला समर्थन

वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेत्यांना ब्रेक लागणे कठीण, अपघात अटळ आहे; फडणवीसांच्या सभेनंतर राऊतांचे ट्विट

उद्धवजी, तुमच्या सत्तेचा बाबरी ढाचा मी खाली पाडणार; देवेंद्र फडणवीसांचा करारा जवाब