दक्षिण आफ्रिकेतून आलेले दोघे कोरोना पॉझिटिव्ह; देशाची चिंता वाढली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दक्षिण आफ्रिका मधील ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरीएन्ट ने संपूर्ण जगाची चिंता वाढवली असतानाच त्यातच आता दक्षिण आफ्रिकेतून भारतात आलेले दोन नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली असून भारतीयांसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.

बंगळूरुच्या केम्पेगौडा  विमानतळावर  शनिवारी (27 नोव्हेंबर) दक्षिण आफ्रिकेतून विमान आले. या विमानात 594 प्रवासी होते. त्यापैकी दोन दक्षिण आफ्रिकेचे नागरिक कोरोनाबाधित आढळले आहेत. दरम्यान, कोरोनाचे नवा स्ट्रेन आहे की नाही याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. या सर्वांना ट्रॅक करून त्यांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेनं (World Health Organization, WHO) शुक्रवारी घातक कोरोना व्हायरसच्या B.1.1529 या नवीन स्ट्रेनला ‘व्हेरिएंट ऑफ कंसर्न’ (Variant of concern) म्हणून संबोधलं आणि त्याला ओमिक्रोन (Omicron) असे नाव दिलं. या श्रेणीतील व्हायरस अत्यंत संसर्गजन्य मानले जातात

You might also like