व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

कराडला ATM स्फोटानंतर दुचाकीचा ब्लास्ट

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड – विटा मार्गावरती सोमवारी दि. 18 रोजी पहाटे बँक ऑफ इंडियाचे ATM जिलेटीन कांड्यांनी उडविण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला होता. यावेळी पोलिसांनी सतर्कता बाळगत चोरीचा कट उधळला होता. तसेच एकाला अटक केली होती, मात्र अन्य 3 जण दुचाकी घेऊन फरार झाले होते. या गुन्ह्यातील दुसरी दुचाकी जिलेटीनसह आज सापडल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांनी ATM नंतर दुचाकीचा स्फोट घडवून आणला.

याबाबतची अधिक माहिती अशी, कराड येथे गजानन हाऊसिंग सोसायटीत असलेल्या बँक ऑफ इंडियाची गोवारे गावची शाखा आहे. याठिकाणी सोमवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी सशस्त्र दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. याबाबतची माहिती कराड शहर पोलिसांना मिळाली होती. तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा चोरट्यांनी पोलिसांच्या डोळ्यात स्प्रे मारून दुचाकी घेऊन पलायन केले होते. तर एक दुचाकी आणि एक चोरटा पकडण्यात यश आले होते.

 

दरोड्यातील चार संशयितांपैकी तीन चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले होते. सदरील दुसरी दुचाकी जिलेटीन कांड्यासह आज पोलिसांना सापडली. दरोड्यातील संशयितांचा अद्याप शोध सुरू असून गाडीचा शोध कराड पोलिसांना 3 दिवसांनी लावला आहे. बॉम्ब स्कॉडच्या श्वान पथकातील श्वनानी गाडीमध्ये स्फोटक वस्तू असल्याचे संकेत दिले होते.

जिलेटीनच्या कांड्या ठेवण्यात आल्या असल्याने त्या कांड्या बाहेर काढणे धोकादायक झाले होते.त्यामुळे त्या जागेवर नष्ट करण्यात आल्या. करवडी (ता. कराड) गावच्या हद्दीत माळरानावर दुचाकी केली नष्ट करण्यात आली. यावेळी मोठ स्फोटासह आवाजही झाला.
जिलेटीनचा ब्लास्ट झाल्याने दुचाकी गाडीने जागेवर पेट घेतला. पोलिसानी गाडी ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.