महाविद्यालये ऑफलाईन पद्धतीने सुरु करण्यास मान्यता; मंत्री उदय सामंत यांची माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे अनेक दिवसापासून ऑनलाईन पद्धतीने महाविद्यालीन विध्यार्थ्यांना शिक्षण देण्यात आले. कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याने ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आल्या. दरम्यान यानंतर “आता ऑफलाईन पद्धतीने प्रत्यक्ष स्वरूपात महाविद्यालय सुरु करण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ट्विटद्वारे दिली.

मंत्री सामंत यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणारी विद्यापीठे, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे वर्ग ऑफलाईन पद्धतीने सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे. लसींच्या दोन मात्रा न घेतलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने क्लास उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.”

“त्याचप्रमाणे राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानांतर्गत (RUSA) 37 कोटी 58 लाख 33 हजार इतका निधी राज्य प्रकल्प संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या खात्यामध्ये जमा करण्यास मान्यता दिली असल्याचे मंत्री सामंत यांनी ट्विटद्वारे म्हंटले आहे.

https://twitter.com/samant_uday/status/1511637736456740865?s=20&t=BDIUgA79v3rCP7VdfNhFQg

यापूर्वी मंत्री सामंत यांनी राज्यातील महाविद्यालय ऑफलाईन सुरू करण्यासंदर्भात उच्च व तंत्र विभागाकडून मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिल्यानंतर महाविद्यालय ऑफलाईन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे म्हंटले होते. त्यानुसार आता त्याला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.

Leave a Comment